Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

परिमिती म्हणजे काय? परिमिती काढण्याची सुत्रे कोणती? परिमिती या घटकावरील प्रश्न कसे सोडवावेत? Notes / Tricks वाचा. PDF डाउनलोड करा.

परिमिती - बंदिस्त आकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज म्हणजे त्या आकृतीची परिमिती होय. 


आमच्या WhatsApp  ग्रुपला सामील व्हा. 


परिमिती या घटकावरील ऑनलाईन टेस्ट सोडवा - Click Here


आणखी ऑनलाईन टेस्ट सोडविण्यासाठी येथे टच करा. Click Here.... 


परिमितीसंबंधी सूत्रे :


(1) त्रिकोणाची परिमिती = त्रिकोणाच्या तिन्ही बाजूंच्या लांबीची बेरीज.

(2) आयताची परिमिती = 2 x लांबी + 2 x रुंदी. किंवा 2(लांबी + रुंदी) 

(3) चौरसाची परिमिती = 4 × बाजूची लांबी.

(4) बहुभुजाकृतीची परिमिती = बहुभुजाकृतीच्या सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज.


नमुना प्रश्न   -       Be Smart with SES

1. सोबतच्या आकृत्यांच्या परिमितीमधील फरक किती ?



(1) 18 सेमी (2) 36 सेमी (3) 54 सेमी (4) 72 सेमी.

स्पष्टीकरण 
पहिल्या आयताची परिमिती= 2 ( 18 + 9) = 54 सेमी 
दुसऱ्या आयताची परिमिती = 2 (12 + 6) = 36 सेमी

परिमितीमधील फरक 54 - 36 = 18 सेमी.

पर्याय (1) हे उत्तर बरोबर. 


2. 80 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती बागेभोवती चारपदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी किती मीटर लांबीची तार लागेल ?

(1) 320 मी (2) 640 मी (3) 960 मी (4) 1280 मी.

स्पष्टीकरण : एकपदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी म्हणजेच बागेची परिमिती
बागेची परिमिती = 4 × बाजूची लांबी 
                       = 4 × 80
                       = 320 मी.


एकपदरी कुंपण घालण्यासाठी लागणाऱ्या तारेची लांबी 320 मी. 

चारपदरी कुंपण घालण्यासाठी तारेची लांबी = 4 × 320 = 1280 मी.

पर्याय (4) हे उत्तर बरोबर. 


3. सोबतच्या आकृतीची परीमिती किती असेल? (मापे सेमी मध्ये) 


(1) 26.5  सेमी                 (3) 25.6  सेमी
(2) 62.5  सेमी                (4) 26.2  सेमी

वरील आकृती त्रिकोणी, चौरस, किंवा आयताकृती नाही ही एक बहुभुजाकृती आहे. त्यामुळे तिची परिमिती काढण्यासाठी सर्व बाजूंची बेरीज घ्यावी लागेल? 
बहुभुजाकृती ची परिमिती = सर्व बाजूंच्या लांबीची बेरीज
                                         = 6.6+4.9+3.5+6.3+5.2
                                         = 26.5 सेमी
पर्याय (1) हे बरोबर उत्तर

Post a Comment

0 Comments

close