एक्स्प्लोर

Osmanabad: सायंकाळी 6 ते 8च्या दरम्यान अख्ख्या गावात मोबाईल, टीव्ही बंद, मुलांच्या अभ्यासासाठी जकेकूरवाडीचा निर्णय

Jakekurwadi: उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी या गावात दररोज मुलांच्या अभ्यासासाठी दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद ठेवण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे. 

उस्मानाबाद: टीव्ही मालिका आणि मोबाईलमुळे प्रत्येकाचे आयुष्य गुरफटून गेलं आहे. याचा परिणाम कुटुंबासह विद्यार्थ्यांच्या आयुष्यावर झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाकडे दुर्लक्ष करत असून त्याचा परिणाम त्यांच्या व्यक्तिमत्व विकासावर होत आहे. अशीच काहीशी भावना असल्याने उस्मानाबाद (Osmanabad) जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातील जकेकूरवाडी (Jakekurwadi) या गावाने मुलांच्यासाठी  दररोज दोन तास घरातील टीव्ही आणि मोबाईल बंद (Mobile phones and TV off) ठेवण्याचा उपक्रम चालू केला आहे. या उपक्रमाला दोन दिवस झालेत. विशेष म्हणजे सर्वांचे मोबाईल आणि टीव्ही सायंकाळी सहा से आठ वाजेपर्यंत बंद ठेवले जात आहेत. 

सायंकाळी सहा ते आठ या वेळेत मुलांच्या अभ्यासासाठी ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. दोन-अडीच हजार लोकसंख्येचे हे गाव आहे. मुले तासंतास मोबाईलला चिकटून असतात. त्यामुळे त्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचे गाऱ्हाणे पालक मांडत असतात. नेमके सायंकाळच्या वेळेस घरात कुणीतरी टीव्ही लावून मालिका पाहण्यात गुंतून जातात. त्याचा परिणाम हा विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर होतो. त्यामुळे जकेकूरवाडी (Osmanabad Jakekurwadi)गावाने हा निर्णय घेतला आहे. 

या गावात दररोज नियमाने टीव्ही आणि मोबाईल बंद करण्याची आठवण करून देण्यासाठी ग्रामपंचायतीवर भोंगा लावण्यात आला आहे. सायंकाळी सहा ते आठ या वेळेत ग्रामपंचायत  रोज सायरन वाजवते. ग्रामीण भागात मुलांना अभ्यासाची सवय लागावी, तसेच टिव्ही आणि मोबाईलसारख्या गोष्टींपासून दूर ठेवण्यासाठी गावामध्ये दररोज सायंकाळी सहा वाजता ग्रामपंचायत कार्यालयातून सायरन वाजवले जाते. त्यामुळे गावकऱ्यांना आपले टीव्ही, मोबाईल, रेडिओ, लाऊड स्पीकर सर्व बंद करायचे आणि सर्व विद्यार्थ्यांनी अभ्यासाला बसायचे अशी सूचना आपोआप मिळते.

राज्यातील हा दुसरा प्रयोग आहे. असा प्रयोग यापूर्वी सांगली जिल्ह्यातील मोहितेची वाडी या गावात करण्यात आला आहे. असा उपक्रम रावणारे हे राज्यातील पहिले गाव ठरले आहे. तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील जकेकूरवाडी हे राज्यातील दुसरे तर मराठवाड्यातील पहिले गाव ठरले आहे. या उपक्रमास विद्यार्थी आणि पालकांनी चांगला प्रतिसाद दिला. मुलं घराबाहेर पडणार नाहीत याची जबाबदारी पालकांसोबत गावातील शिक्षक, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यावर आहे.

ही बातमी वाचा: 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते  कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Chhatrapati Sambhaji Nagar Rada : संभाजीनगरमध्ये  मराठा समन्वयकांच्या बैठकीत राडाSatara : Sharad Pawar साताऱ्यात दाखल , माढा आणि साताऱ्याचा उमेदवार ठरणार ?Bachchu Kadu : दुपारी 1 वाजता पत्रकार परिषद; बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार!ABP Majha Headlines : एबीपी माझा हेडलाईन्स : 11 AM :  29 March 2024 : Maharashtra News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
कथित खिचडी घोटाळ्याप्रकरणी अमोल किर्तीकरांना दुसरं समन्स; 8 एप्रिलला चौकशीला हजर राहण्याचे आदेश
OTT Web Series Release : कोर्ट रुम ड्रामा ते  कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
कोर्ट रुम ड्रामा ते कॉमेडी शो; या वीकेंडला ओटीटीवर कोणते वेब सीरिज-चित्रपट? पाहा यादी
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
Vasant More : वसंत मोरे 'राजगृह'वर, प्रकाश आंबडेकरांच्या भेटीनंतर पुणे लोकसभेत ट्विस्ट?
MLA Nilesh Lanke Resignation : निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता, सभेत करणार घोषणा? शरद पवारांचं बळ वाढणार?
Premachi Goshta Latest Episode : सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
सावनी आगीत तेल ओतणार, सागर-मुक्ताचे प्रेम बेचिराख होणार? आदित्यच्या निर्णयाने नवा ट्विस्ट
Exclusive: अर्ज मागे घेणार नाही, निवडणूक लढवणारचं, बंड केलेलं नाही; पक्षाकडून प्रतापराव खासदारांना उमेदवारी, तरीही संजय गायकवाड ठाम
मी निवडणूक लढवण्यावर ठाम, बंड केलेलं नाही; शिंदेंची यादी जाहीर झाल्यानंतर संजय गायकवाड ठाम
Shubha Khote Husband Death : 60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
60 वर्षांची साथ सुटली...अभिनेत्री शुभा खोटे यांच्या पतीचे निधन, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
Rashmi Barve : मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
मी अबला नाही म्हणत रश्मी बर्वेंनी थोपटले दंड! अर्ज बाद झाल्यानंतर घेतला मोठा निर्णय; माघार नाहीच!
Embed widget