एक्स्प्लोर

Jalgaon Gram Panchayat Election Results : जळगावात भाजप-काँग्रेसला भोपळा! 13 पैकी एकही ग्रामपंचायत मिळाली नाही 

जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे (Election News) निकाल आज हाती आले. दरम्यान भाजप आणि काँग्रेसला या 13 पैकी एकाही जागेवर सत्ता आणणं शक्य झालं नाही

Gram Panchayat Election Results 2022 : जळगाव जिल्ह्यातील (Jalgaon News) 13 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचे (Election News) निकाल आज हाती आले. दरम्यान भाजप आणि काँग्रेसला या 13 पैकी एकाही जागेवर सत्ता आणणं शक्य झालं नसल्याचं निकालातून स्पष्ट झालं आहे.  जळगाव जिल्ह्यातील 13 ग्रामपंचायतींची निवडणूक होती.  त्यात चोपडा तालुक्यातील 11 तर यावल तालुक्यातील 2 ग्रामपंचायतींची निवडणूक झाली.  थेट जनतेतून सरपंच निवडला जाणार असल्याने ग्रामपंचायत निवडणुकीचा उत्साह मोठा होता. सत्तांतराच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीला विशेष महत्त्व देखील आलं होतं. 

चोपडा तालुक्यातील 11 ग्रामपंचायतीसाठी सदस्यपदासाठी 201 तर सरपंच पदासाठी 77 उमेदवारांचे अर्ज दाखल होते. माघारीनंतर 98 उमेदवार थेट रिंगणात होते. त्यात 54 उमेदवार बिनविरोध निवडून आले तर 44 उमेदवार रिंगणात होते. त्यात 11 सरपंच पदासाठी 77 उमेदवार रिंगणात होते.  यावल तालुक्यातील 2 ग्रामपंचायतीसाठी 24 जागांसाठी 48 उमेदवार रिंगणात होते. यावल तालुक्यात दोन सरपंच पदासाठी 10 उमेदवार रिंगणात होते. 

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. जिल्ह्यातील काही नेत्यांनी देखील शिवसेना सोडत शिंदे गटात जाणं पसंत केलं होतं. शिवसेना आणि शिंदे गटाला प्रत्येकी तीन ग्रामपंचायती या निकालानंतर मिळाल्या आहेत.

जळगाव जिल्हातील निकाल अशाप्रमाणे

एकूण ग्रामपंचायत- 13
निकाल जाहीर 13

शिवसेना - 03 
शिंदे गट - 03
भाजप- 00
राष्ट्रवादी- 03
काँग्रेस- 00
अपक्ष -04

निकालानंतर काय म्हणाले मंत्री गुलाबराव पाटील
 
या निकालानंतर बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे की, चोपड्यामध्ये स्थानिक आमदार सोनवणे यांनी केलेल्या कामावर लोकांनी विश्वास ठेऊन हा कल दिला आहे. आमदारांनी चांगल काम केलं तर गाव पातळीवर असेच निकाल पाहायला मिळतात, असं मंत्री गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. मात्र भाजपला एकही जागा मिळविता आली नाही यावर मात्र त्यांनी मौन बाळगणे पसंत केले.   राज्यभरात आज लागलेल्या निकालावर आम्ही समाधानी आहोत. भाजपला चांगल यश मिळाले आहे. मागील काळात आम्ही उद्धव ठाकरे यांना आम्ही सांगत होतो. पक्ष सांभाळला गेला पाहिजे मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्याने पक्षाची काय वाताहत होते हे आजच्या निकालावरून पाहायला मिळत आहे, असं ते म्हणाले. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षावर होत नसली तरी जनता कोणत्या दिशेने आहे यामधून कळत असते त्यामुळे पुढील जिल्हापरिषद आणि पंचायत समितीमध्येही आणि 2024 मध्येही असेच  निकाल पाहायला मिळू शकतात अस गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे. 

इतर महत्वाचा बातम्या

Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: आतापर्यंतच्या निकालात भाजप आणि राष्ट्रवादीला सर्वाधिक जागा; ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल, सर्व अपडेट्स

Gram Panchayat Election Results : जळगाव -चोपडामध्ये राष्ट्रवादीचा विजय तर जुन्नरमध्ये 3 जागांवर भाजप

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Helicopters Collide in Malaysia: नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
Chinmay Mandlekar : काळ माफ करत नसतो...कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत...; जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर कवयित्रीची पोस्ट चर्चेत
काळ माफ करत नसतो...कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत...; जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर कवयित्रीची पोस्ट चर्चेत
Video : मुंबईविरुद्ध IPLमधील इतिहास घडवला अन् लाडक्या रोहित भैय्याला 'यशस्वी' मिठी मारली!
Video : मुंबईविरुद्ध IPLमधील इतिहास घडवला अन् लाडक्या रोहित भैय्याला 'यशस्वी' मिठी मारली!
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Nilesh Lanke : नको त्या गोष्टींना महत्त्व न देत्या आपल्या मार्गानं पुढं जायचं असतं - निलेश लंकेHemant Godse : नाशिकमधून हेमंत गोडसेंचं नाव जवळपास निश्चितSanjog Waghere : श्रीरंग बारणेंचा पराभव निश्चित;संजोग वाघेरेंचा विश्वासNilesh Lanke Family : पैसे नसल्याने साध्या पद्धतीने अर्ज भरणार; निलेश लंकेंच्या वडिलांची प्रतिक्रीया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Helicopters Collide in Malaysia: नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
नौदलाची ड्रील सुरु असताना दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच टक्कर, 10 जणांचा मृत्यू
Chinmay Mandlekar : काळ माफ करत नसतो...कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत...; जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर कवयित्रीची पोस्ट चर्चेत
काळ माफ करत नसतो...कोवळ्या मनावर जे व्रण पडताहेत...; जहांगीर ट्रोलिंग प्रकरणावर कवयित्रीची पोस्ट चर्चेत
Video : मुंबईविरुद्ध IPLमधील इतिहास घडवला अन् लाडक्या रोहित भैय्याला 'यशस्वी' मिठी मारली!
Video : मुंबईविरुद्ध IPLमधील इतिहास घडवला अन् लाडक्या रोहित भैय्याला 'यशस्वी' मिठी मारली!
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Rani Lanke Ahmednagar : अहमदनगर दक्षिणमध्ये निलेश लंकेंचाच विजय होणार; राणी लंकेंना विश्वास
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
Video : आयपीएलमध्ये चहलने इतिहास घडवताच गुडघ्यावर बसून स्टाईलमध्ये सेलिब्रेशन!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
मोठी बातमी! अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना 'वाय प्लस' दर्जाची सुरक्षा!
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
'प्रचारात पैसे वाटल्याची सत्यता पडताळा', ओमराजेंसह अर्चना पाटीलही निवडणूक आयोगाच्या रडारवर
Lok Sabha Elections 2024 Election Commission: आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा  निवडणूक आयोगाला सवाल
आम्ही रोखू पण, तुमचं काय? आचारसंहितेवरून दिग्दर्शकाचा निवडणूक आयोगाला सवाल
Embed widget