एक्स्प्लोर

BAMS Admission : आयुर्वेद पदवी, पदव्युत्तर प्रवेशाला अखेर हिरवा झेंडा; विद्यार्थ्यांच्या लढ्याला यश

आतातरी शासनाच्यावतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील सुविधा, दर्जा आणि आवश्यक बाबींकडे लक्ष देऊन प्राधान्याने सोडवाव्या अशी मागणी विद्यार्थ्यांच्या संघटनेने केली आहे.

Nagpur News : भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाद्वारे महाराष्ट्रातील नागपूर, नांदेड, उस्मानाबाद, मुंबई, जळगाव येथील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांतील पदवी आणि पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेला थांबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पहिल्या यादीत उपरोक्त महाविद्यालयात एकही प्रवेश झाला नाही. मात्र दुसऱ्या प्रवेश फेरीत प्रवेशाला हिरवा झेंडा मिळाला आहे. यामुळे 2022-23 मधील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील पदवी (Bachelor of Ayurvedic Medicine and Surgery (BAMS) आणि पदव्युत्तर प्रवेश (Post Graduate courses (MD) Courses) प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला. 

आयुर्वेदातील निमा संघटनेतर्फे महाराष्ट्र शासन तसेच आयुष संचालकांना निवेदन देत प्रवेशासाठी आंदोलन करण्यात आले होते. निमाच्या या लढ्याचा एबीपी माझानेही पाठपुरावा केला. महाराष्ट्रातील शासकीय आयुर्वेद महाविद्यालयांमधील प्राध्यापकांच्या रिक्त जागा, हॉस्पिटल कर्मचारी, रुग्णखाटा, पशुगृहे यांच्यात त्रुटी असल्याने भारतीय चिकित्सा पद्धती राष्ट्रीय आयोगाने पाचही आयुर्वेदिक महाविद्यालयाच्या 563 पदवी आणि 264 पदव्युत्तर प्रवेश प्रक्रियेवर बंदी घातली होती.

21 नोव्हेंबर 2022 रोजी शपथपत्र देत सर्व त्रुटी दूर करण्याचे आश्वासन दिले. यामुळे राष्ट्रीय आयोगाने 'सशर्त परवानगी' प्रवेशाला परवानगी दिली. तर 2023-2024 मधील पदवी आणि पदव्युत्तर प्रदेशासाठी 31 डिसेंबर 2022 रोजी राज्याच्या आयुष संचालकांना प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेशही दिले आहेत. विहित कालावधीत निर्देशित त्रुटींची पूर्तता झाल्यासंबंधी अनुपालन अहवाल सादर करण्याचे सूचित केले आहे.

नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनतर्फे आयुष मंत्रालय, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, वैद्यकीय शिक्षण मंत्री, सचिव वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग यांच्याकडे प्रवेशासाठी पाठपुरावा करत आंदोलन केले. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या विद्यार्थ्यांना याचा फटका बसणार ही बाब 'एबीपी माझा'ने ठळकपणे मांडली होती

शासनाने आता तरी लक्ष द्यावे...

शासनाचे आयुर्वेद महाविद्यालयाकडे (Government Ayurved College and Hospital) असलेल्या दुर्लक्षामुळे प्रवेश रद्द करण्याची वेळ आली होती. त्यामुळे आतातरी शासनाच्यावतीने शासकीय आयुर्वेद महाविद्यालयातील रिक्त असलेल्या प्राध्यापकांच्या जागा कंत्राटीऐवजी महाराष्ट्र लोकसेवा आयोग अथवा निवड समितीच्या माध्यमातून सरळ सेवेतून भरावी. तसेच आवश्यक सर्व सुविधांची पूर्तता करावी. शासनाच्या उदासिनतेचा फटका विद्यार्थ्यांना बसतो, त्यामुळे हिवाळी अधिवेशनातही याचा पाठपुरावा करणार असल्याचे नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या प्रतिनिधींनी 'एबीपी माझा'शी बोलताना सांगितले.

ही बातमी देखील वाचा

Adhaar Card : नागपुरात आधार अ‍ॅट बर्थ बंधनकारक; आता जन्मतःच मिळणार बाळाचे आधार कार्ड

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Raj Thackeray : शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंची अजितदादांवर स्तुतीसुमनं
शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंची अजितदादांवर स्तुतीसुमनं
Raj Thackeray: ... म्हणून मी आज पुण्यात सभा घेतली; राज ठाकरेंनी सभेच्या सुरुवातीलाच सांगितलं राज'कारण'
... म्हणून मी आज पुण्यात सभा घेतली; राज ठाकरेंनी सभेच्या सुरुवातीलाच सांगितलं राज'कारण'
Raj Thackeray: मशिदीतून फतवे निघत असतील तर आज मी फतवा काढतो, महायुतीला मतदान करा : राज ठाकरे
Video: मशिदीतून फतवे निघत असतील तर आज मी फतवा काढतो, महायुतीला मतदान करा : राज ठाकरे
Bhendwal Ghatmandni : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी संपन्न, शनिवारी सूर्योदयावेळी वर्तवला जाणार अंदाज
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी संपन्न, शनिवारी सूर्योदयावेळी वर्तवला जाणार अंदाज
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

PM Narendra Modi SUPER EXCLUSIVE : जिवंत असेपर्यंत आरक्षणाला धक्का लागणार नाही, मोदींची मुलाखतRaj Thackeray speech Pune : Ajit Pawar यांचं कौतुक, हिंदूंसाठी फतवा, मुरलीधर मोहोळ यांची सभा गाजवलीNarendra Dabholkar Case : 1 खटला,10 वर्षे,2 दोषी,3 निर्दोष;निकाल लागला, न्याय मिळाला? Special ReportPM Modi vs Sharad Pawar : मोदींकडून वेलकम; पवारांचा नो थॅक्स Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Raj Thackeray : शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंची अजितदादांवर स्तुतीसुमनं
शरद पवारांसोबत राहूनही अजित पवारांनी कधीही जातीचं राजकारण केलं नाही; राज ठाकरेंची अजितदादांवर स्तुतीसुमनं
Raj Thackeray: ... म्हणून मी आज पुण्यात सभा घेतली; राज ठाकरेंनी सभेच्या सुरुवातीलाच सांगितलं राज'कारण'
... म्हणून मी आज पुण्यात सभा घेतली; राज ठाकरेंनी सभेच्या सुरुवातीलाच सांगितलं राज'कारण'
Raj Thackeray: मशिदीतून फतवे निघत असतील तर आज मी फतवा काढतो, महायुतीला मतदान करा : राज ठाकरे
Video: मशिदीतून फतवे निघत असतील तर आज मी फतवा काढतो, महायुतीला मतदान करा : राज ठाकरे
Bhendwal Ghatmandni : अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी संपन्न, शनिवारी सूर्योदयावेळी वर्तवला जाणार अंदाज
अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर भेंडवळची घटमांडणी संपन्न, शनिवारी सूर्योदयावेळी वर्तवला जाणार अंदाज
मोदी म्हणाले, तुमचा आवाज बसलाय, जागरण कमी करा; पंतप्रधानांचं गुणगान गात शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
मोदी म्हणाले, तुमचा आवाज बसलाय, जागरण कमी करा; पंतप्रधानांचं गुणगान गात शिंदेंचा ठाकरेंवर हल्लाबोल
Rahul Gandhi : यूपीमध्ये इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी आकडा सांगताच अखिलेश यादवांची कळी खुलली!
यूपीत इंडिया आघाडी किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी आकडा सांगताच अखिलेश यादवांची कळी खुलली!
Gunaratna Sadavarte : शरद पवार, दाऊदवर बोलल्याने भारताबाहेरून धमकीचा फोन, गुणरत्न सदावर्तेंचा दावा; भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
शरद पवार, दाऊदवर बोलल्याने भारताबाहेरून धमकीचा फोन, गुणरत्न सदावर्तेंचा दावा; भोईवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल
Bijapur Naxal News : छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवादी चकमक सुरू, सहा नक्षलवाद्यांचा खात्मा; टॉप कमांडर लिंगा, पापारावला जंगलात घेरलं
छत्तीसगडमध्ये सुरक्षा दल-नक्षलवादी चकमक सुरू, सहा नक्षलवाद्यांचा खात्मा; टॉप कमांडर लिंगा, पापारावला जंगलात घेरलं
Embed widget