Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

सेतू अभ्यासक्रम राबविणेबाबत शिक्षक व पालकांसाठी सूचना

सेतू अभ्यासक्रम ( Bridge course ) राबविणेबाबत शिक्षक व पालकांनी पुढील सूचनांचे वाचन करावे. 


दिवसनिहाय सेतू अभ्यास  मिळण्यासाठी  Telegram Channel जॉईन करा. 

Covid-19 च्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे मागील शैक्षणिक वर्षात प्रत्यक्ष विद्यार्थी समोर असताना वर्ग अध्यापन होऊ शकले नाही. नव्या शैक्षणिक वर्षात ही शाळा कधी सुरू होतील याबाबत अनिश्चितता आहे. मागील शैक्षणिक वर्षात आपण ऑनलाइन माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण पोहोचवण्यासाठी विविध प्रयत्न केलेत. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांनी केलेल्या अध्ययनाची उजळणी व्हावी तसेच नवीन शैक्षणिक वर्षात शिकाव्या लागणाच्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी हा दुहेरी उद्देश ठेवून हा सेतू अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

शिष्यवृत्ती परीक्षेच्या तयारीसाठी सर्व विषयांच्या घटकनिहाय Online Test सोडविण्यासाठी उपयुक्त वेबसाइट - येथे टच करा. 


1. सेतू अभ्यासक्रम एकूण 30 दिवसांचा असून त्यात पूर्व व उत्तर चाचण्यांचा समावेश आहे. 

2. सेतू अभ्यासक्रम हा मागील इयत्तेच्या पाठ्यक्रमावर आधारित असून मागील इयत्तेचा पाठ्यक्रम सध्याच्या इयत्तेचा पाठ्यक्रम यांना जोडणारा दुवा आहे. 

3. सदर अभ्यासक्रम हा इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून तो मागील इयत्तेच्या पाठ्यपुस्तकाशी संलग्न व त्यातील घटकांवर आधारित आहे. 

4. सदर अभ्यासक्रमात घटक व उपघटकनिहाय कृतिपत्रिकांचा (वर्कशीट) समावेश आहे. कृतिपत्रिका या अध्ययन निष्पत्ती / क्षमता विधाने डोळ्यासमोर ठेवून तयार करण्यात आल्या आहेत. 

महत्त्वाचे - इ. 1ली ते इ. 12वी साठी डी डी सह्याद्री वाहिनीवर ज्ञानगंगा शैक्षणिक कार्यक्रम.... प्रत्येक आठवड्याचे वेळापत्रक पहा.

5. कृतिपत्रिका या सामान्यपणे सहा भागांत देलेल्या आहेत. इयत्तानिहाय त्यात थोडाफार फरक आढळून येईल. 

पहिला भाग - अध्ययन निष्पत्ती - विद्यार्थी नेमके काय शिकणार आहे.

दुसरा भाग - थोड समजून घेऊ - संकल्पनांचे स्पष्टीकरण 

तिसरा भाग - चला सराव करू - सरावासाठी उदाहरणे

चौथा भाग - सोडवून पाहू - विद्यार्थ्यांना संकल्पना समजली की नाही हे पाहण्यासाठी प्रश्न / कृती / स्वाध्याय. 

पाचवा भाग - थोडी मदत - संकल्पना अधिक चांगल्या रीतीने समजून घेण्यासाठी मदत हवी म्हणून व्हिडीओ लिंक, क्यू आर कोड इत्यादीचा समावेश.

सहावा भाग - हे मला समजले - विद्यार्थ्यांनी स्वयंमूल्यांकन करावे यासाठी अध्ययन निष्पत्ती दर्शक विधाने. 

6. मागील शैक्षणिक वर्षात विद्यार्थी नेमके काय शिकले हे समजण्यासाठी, त्याची चाचपणी करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना पुढील इयत्तेतील पाठ्यक्रम समजून घेण्यासाठी हा अभ्यासक्रम अत्यंत महत्वाचा ठरणार आहे.

7. शिक्षकांनी प्रत्येक विद्यार्थ्यांकडून सदरचा सेतू अभ्यासक्रम दिवसनिहाय नियोजनाप्रमाणे पूर्ण करून घ्यावा.

8. सेतू अभ्यासक्रमातील कृतिपत्रिका विद्यार्थी प्रामाणिकपणे व स्वप्रयत्नाने सोडवतील याकडे शिक्षकांचे लक्ष असावे, विद्यार्थ्यांच्या अडचणी समजून घेऊन योग्य ती मदत करावी.

9. ठराविक घटकांची उजळणी झाल्यानंतर देण्यात आलेल्या चाचण्या विद्यार्थ्‍यांकडून सोडवून घ्याव्यात. चाचण्या तपासून त्यांना योग्य निकषांचा अवलंब करून गुणदान करावे व गुणांची नोंद करून ठेवावी.

10. प्रत्येक चाचणीचे मूल्यमापन झाल्यानंतर ज्या विद्यार्थ्‍यांना उपचारात्मक अध्यापनाची आवश्यकता आहे, त्या विद्यार्थ्‍यांना योग्य असे मार्गदर्शन करावे. याप्रमाणे तीनही चाचण्यांची अंमलबजावणी करावी.

11. हा 30 दिवसांचा सेतू अभ्यासक्रम पूर्ण झाल्यानंतर आपल्या नियमित अभ्यासक्रमाच्या अध्यापनास सुरुवात करावी.


संचमान्यता सन 2019-20 व सन 2020-21 माहिती भरण्यासाठी step by step Guide. 

Post a Comment

0 Comments

close