एक्स्प्लोर

National Cinema Day : राष्ट्रीय चित्रपट दिनी थिएटर हाऊसफुल! 75 रुपयांच्या तिकीटांना प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद

National Cinema Day : नुकताच देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ साजरा करण्यात आला. या खास निमित्ताने कोणताही चित्रपट अवघ्या 75 रुपयांत प्रेक्षकांना पाहता आला आहे.

National Cinema Day : नुकताच देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ (National Cinema Day) साजरा करण्यात आला. या खास निमित्ताने कोणताही चित्रपट अवघ्या 75 रुपयांत प्रेक्षकांना पाहता आला आहे. अवघ्या 75 रुपयांच्या तिकीटावर चित्रपट पाहायला मिळणार असल्याने प्रेक्षकांनी देखील चांगलीच गर्दी केली होती. या दिवशी जवळपास सगळे थिएटर हाऊसफुल झाले होते. तिकीट दर कमी असल्याने चित्रपटगृहांमध्ये प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. राष्ट्रीय चित्रपट दिनाचं निमित्त साधत राबवण्यात आलेल्या या उपक्रमाला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला.

23 सप्टेंबर रोजी देशभरात ‘राष्ट्रीय चित्रपट दिन’ साजरा करण्यात आला.  राष्ट्रीय चित्रपट दिनाचे निमित्त साधत देशभरात अवघ्या 75 रुपयांमध्ये प्रेक्षकांना चित्रपटांचा आस्वाद घेता आला. तिकीटाचे दर कमी असल्याने चित्रपटगृहांमध्ये चांगलीच गर्दी पाहायला मिळाली. तब्बल 65 लाखांहून अधिक लोकांनी या दिवशी मनोरंजनाचा आस्वाद घेतला आहे. मात्र, आता यावरून देखील अनेक सवाल उपस्थित होत आहेत.

थिएटर झाले हाऊसफुल!

मल्टीप्लेक्स ऑफ इंडियानं (MAI)  23 सप्टेंबर रोजी ‘राष्ट्रीय चित्रपट दिनाचं निमित्त साधत सगळे चित्रपट 75 रुपयांमध्ये पाहता येणार असल्याची घोषणा केली होती. पीवीआर, आयनॉक्स, सिनेपोलिस, कार्निवल, मिराज आणि सिटी प्राइड, एशियन, मुक्ता ए 2, मूवीटाइम, वेव, एम 2 के आणि डिलाइट या देशभरातील मल्टीप्लेक्समध्ये 'राष्ट्रीय चित्रपट दिनी' हा उपक्रम राबवण्यात आला होता. या दिवशी तब्बल 65 लाखांहून अधिक लोकांनी चित्रपटगृहांमध्ये जाऊन चित्रपट पाहण्याचा आनंद लुटला.

मनोरंजन महाग झालंय का?

कोरोना काळानंतर प्रेक्षकांनी चित्रपटगृहांकडे पाठ फिरवली होती. मात्र, या निमित्ताने पुन्हा एकदा हाऊसफुल गर्दी पाहायला मिळाली. तिकिटाचे दर कमी केल्यानंतर वाढलेली प्रेक्षकांची गर्दी पाहता मनोरंजन महाग झालंय का?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. अभिनेता आणि निर्माता हेमंत ढोमे यानेही एक पोस्ट करून असाच सवाल उपस्थित केला होता. त्याने आपल्या पोस्टमध्ये म्हटले होते की, ‘आज राष्ट्रीय सिनेमा दिनाच्या निमित्ताने चित्रपटगृहांनी 75 रु. असा सवलतीचा तिकीट दर लावल्यानंतर प्रेक्षकांनी तुडुंब गर्दी केली आहे. सगळीकडे मराठी सिनेमा हाऊसफुल्ल! म्हणजे तिकीट दर कमी असतील तर प्रेक्षक गर्दी करू शकतात? प्रेक्षकांसाठी मनोरंजन महाग होतंय का?’ केवळ हेमंत ढोमेच नाही तर, चित्रपट व्यवसाय विश्लेषक तराण आदर्श यांनीही मनोरंजन विश्वाला एक इशारा दिला आहे.

तरण आदर्श यांनी देखील या संदर्भात एक पोस्ट लिहिली आहे. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले की, ‘राष्ट्रीय चित्रपट दिनी चित्रपटांना मिळालेला उदंड प्रतिसाद हा चित्रपट वितरक, स्टुडिओ आणि प्रदर्शक यांच्यासाठी एक धडा आहे. यामुळे तिकीटांच्या कमी दराचं महत्त्व अधोरेखित झालं आहे. आता वेळ आली की, तिकीटांच्या दरावर पुन्हा विचार करण्याची..’

संबंधित बातम्या

National Cinema Day : सिनेप्रेमींसाठी खुशखबर! 'राष्ट्रीय चित्रपटदिनी' सिनेमे पाहा फक्त 75 रुपयांत

National Cinema Day 2022: राष्ट्रीय चित्रपट दिनी 75 रुपयांमध्ये चित्रपट बघायचाय? असं बुक करा तिकीट

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी
हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : वारे निवडणुकीचे : सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 27 April 2024Zero Hour Baramati:Sunetra Pawar यांचा प्रचार कसा सुरू आहे?बारामतीकर कुणाला निवडून देणार?Ground ZeroUjjwal Nikam BJP Candidate Loksabha: पूनम महाजन यांचा पत्ता कट, उज्ज्वल निकम यांना भाजपकडून उमेदवारीPm Narendra Modi Rally Kolhapur : कोल्हापुरात मोदींचा इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
भाजपने तिकीट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या...
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
वंचितने उमेदवार बदलला! संजीव कलकोरी ऐवजी परमेश्वर रणशूर यांना उमेदवारी, दौलत कादर खान यांनाही लोकसभेचं तिकीट
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या;  फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
पोलिसांनी उलगडलं गूढ, अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार, दगडाने ठेचून हत्या; फरार चौघांच्या आवळल्या मुसक्या
हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी
हार्दिक पांड्याला जास्त महत्व द्यायची गरज नाही, इरफान पठाणची BCCI कडे मागणी
Richest Indian Youtuber : सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
सर्वात महागडा युट्यूबर कोण? भुवन बामलाही टाकलंय मागे
राहुलचं दमदार अर्धशतक, लखनौचं राजस्थानसमोर 197 धावांचे आव्हान
राहुलचं दमदार अर्धशतक, लखनौचं राजस्थानसमोर 197 धावांचे आव्हान
अमित शाह आणि मुख्यमंत्री शिंदेंची मिमिक्री; विनायक राऊतांच्या प्रचारसभेत भास्कर जाधवांकडून जोरदार फटकेबाजी
अमित शाह आणि मुख्यमंत्री शिंदेंची मिमिक्री; विनायक राऊतांच्या प्रचारसभेत भास्कर जाधवांकडून जोरदार फटकेबाजी
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
रोहित-सूर्या फ्लॉप, तिलकची एकाकी झुंज, दिल्लीचा मुंबईवर 10 धावांनी विजय
Embed widget