एक्स्प्लोर

आता गुगल करणार संस्कृतचा जगभरात प्रसार! विविध भाषांमध्ये भाषांतर होणार, नेमका काय आहे सामंजस्य करार...

संस्कृत भाषेला वैश्विक स्तरावर पोहोचवण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. ICCR चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि Google च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

ICCR And Google For Sanskrit Language: संस्कृत भाषेच्या प्रसार आणि प्रचारासाठी आता गुगल महत्वाची भूमिका बजावणार आहे. इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सने (ICCR) गुरुवारी संस्कृत भाषेचा प्रसार करण्यासाठी Google सामंजस्य करार केला आहे.  ICCR आणि Google मध्ये संस्कृत साहित्याचा इतर अनेक भाषांमध्ये अनुवाद करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या मदतीनं कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगचा वापर केला जाणार आहे. 

संस्कृत भाषेला जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी हा करार करण्यात आला आहे. ICCR चे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे आणि Google च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.

या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली. या अंतर्गत संस्कृतमधील सामान्यतः वापरल्या जाणार्‍या एक लाख ओळींचा इंग्रजी आणि हिंदी अनुवाद गुगलवर उपलब्ध केला जातोय. यासाठी प्राध्यापक अमरजीव लोचन यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली विद्यापीठातील संस्कृत विभागाचे विद्यार्थी आणि शिक्षकांचा समावेश होता.

भारतीय संस्कृतीचे सर्व बारकावे आणि भाषिक परंपरा समजून घेण्यासाठी जगभरातील लोकांना मदत व्हावी, यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. ICCR जागतिक स्तरावर संस्कृत पोहोचवण्यासाठी एक पूल बनवण्यात गुगलनं मोठा हातभार लावला आहे, असं ICCRचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे म्हणाले. ICCR ला अपेक्षा आहे की, Google ला दिलेल्या कच्च्या डेटा सेटसह मशीन लर्निंग मॉडेलला हळूहळू प्रशिक्षण देऊन Google च्या संस्कृत भाषांतराची अचूकता वाढवणे शक्य होणार आहे. 

मे महिन्यात संस्कृतसह आठ भारतीय भाषा गुगल ट्रान्सलेटमध्ये दाखल करण्यात आल्या होत्या. गुगल ट्रान्सलेट अपडेटमध्ये आसामी, भोजपुरी, डोगरी, कोकणी, मैथिली, मिझो आणि मीतेइलॉन (मणिपुरी) या भाषा आहेत.

Google रिसर्च लॅबचे संचालक मनीष गुप्ता म्हणाले, "जेव्हा आम्ही तीन वर्षांपूर्वी गुगल रिसर्च लॅब सुरू केली, तेव्हा मला एक गोष्ट खूप आवडली होती. ती म्हणजे तंत्रज्ञानाचा वापर करून भाषांमधील समस्यांवर काम करणे. Google उत्पादनांच्या क्षमतांमध्ये इंग्रजी विरुद्ध भारतीय भाषांमधील क्षमतांमध्ये खूप महत्त्वाची तफावत पाहिली आहे. त्यामुळं आम्ही हे पाऊल उचललं आहे.  प्रत्येक भारतीयाला त्यांच्या स्थानिक भाषेत इतर भाषेतील माहिती देण्यासाठी आम्ही काम करत आहोत, यात  संस्कृतला एक विशेष स्थान आहे, असं गुप्ता म्हणाले. 

इतर महत्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : महानुभाव पंथाच्या आशीर्वादाचं सरकार, रिद्धीपूरला मराठी भाषा विद्यापीठ होणार : देवेंद्र फडणवीस

भाषा संचालनालयाच्या माध्यमातून प्रत्येक स्पर्धा परीक्षा मराठीतूनच घेण्याविषयी धोरण ठरवावे, औरंगाबाद खंडपीठाचे राज्य शासनाला निर्देश

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rahul Gandhi on PM Narendra Modi : अदानी-अंबानी ते खटा-खट... मी पंतप्रधान मोदींकडून काहीही बोलून घेऊ शकतो : राहुल गांधी
अदानी-अंबानी ते खटा-खट... मी पंतप्रधान मोदींकडून काहीही बोलून घेऊ शकतो : राहुल गांधी
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायने 'कान्स 2024'मध्ये दुसऱ्या दिवशीही दाखवला जलवा; चाहते म्हणाले,
ऐश्वर्या रायने 'कान्स 2024'मध्ये दुसऱ्या दिवशीही दाखवला जलवा; चाहते म्हणाले,"विश्वसुंदरी म्हणू की निल परी"
Horoscope Today 18 May 2024 : मेष, कन्यासह 'या' राशींवर असेल शनीची कृपा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, कन्यासह 'या' राशींवर असेल शनीची कृपा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
भगवा आमचा स्वाभिमान, उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही, त्यांचा संबंध आता...; गोपिचंद पडळकरांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही, त्यांचा संबंध आता... : गोपिचंद पडळकर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

TOP 70 : टॉप 70 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 70 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaBJP-Shivsena Rada Mulund : भाजप उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाबाहेर राडा! ABP MajhaABP Majha Headlines : 07.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 18 May 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rahul Gandhi on PM Narendra Modi : अदानी-अंबानी ते खटा-खट... मी पंतप्रधान मोदींकडून काहीही बोलून घेऊ शकतो : राहुल गांधी
अदानी-अंबानी ते खटा-खट... मी पंतप्रधान मोदींकडून काहीही बोलून घेऊ शकतो : राहुल गांधी
Aishwarya Rai : ऐश्वर्या रायने 'कान्स 2024'मध्ये दुसऱ्या दिवशीही दाखवला जलवा; चाहते म्हणाले,
ऐश्वर्या रायने 'कान्स 2024'मध्ये दुसऱ्या दिवशीही दाखवला जलवा; चाहते म्हणाले,"विश्वसुंदरी म्हणू की निल परी"
Horoscope Today 18 May 2024 : मेष, कन्यासह 'या' राशींवर असेल शनीची कृपा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, कन्यासह 'या' राशींवर असेल शनीची कृपा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
भगवा आमचा स्वाभिमान, उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही, त्यांचा संबंध आता...; गोपिचंद पडळकरांचा हल्लाबोल
उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिलेला नाही, त्यांचा संबंध आता... : गोपिचंद पडळकर
Bollywood Movie : पाच लाख शेतकऱ्यांनी दोन-दोन रुपये जमवून बनवला चित्रपट, आता 48 वर्षांनी 'कान्स'मध्ये होणार स्पेशल शो; तुम्ही पाहिलाय का चित्रपट?
पाच लाख शेतकऱ्यांनी दोन-दोन रुपये जमवून बनवला चित्रपट, आता 48 वर्षांनी 'कान्स'मध्ये होणार स्पेशल शो; तुम्ही पाहिलाय का चित्रपट?
मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
Health : स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरताय तर सावधान! कर्करोगाचा धोका वाढतोय, ICMR ने सांगितले, किती दिवस जुने तेल वापरता येईल?
Health : स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरताय तर सावधान! कर्करोगाचा धोका वाढतोय, ICMR ने सांगितले, किती दिवस जुने तेल वापरता येईल?
RCB vs CSK : प्लेऑफसाठी फायनल लढत, आरसीबी अन् चेन्नईची काटें की टक्कर, प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट
RCB vs CSK : प्लेऑफसाठी फायनल लढत, आरसीबी अन् चेन्नईची काटें की टक्कर, प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट
Embed widget