Bridge course 2022-23 for Std. 2 to 10

 

Effective Implementation of Reconstructed Bridge course 2022-23 at School Level 

 पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबत ..

📲 पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ पूर्व चाचणी इ. 2 री ते 10 वी साठी येथे क्लिक करा. 👈

 💥 कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मागील दोन वर्षामध्ये नियमित शाळा सुरु होऊ शकल्या नाहीत . या आव्हानात्मक परिस्थितीमुळे विद्यार्थ्याचा अध्ययन -हास झालेला आहे हे विविध सर्वेक्षणानुसार निदर्शनास येत आहे . तसेच , राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण २०२१ नुसार भाषा , गणित , विज्ञान आणि सामाजिक शास्त्र या विषयातील राज्यातील विद्यार्थ्यांची संपादणूक कमी दिसून येत आहे . या सर्वांचा परिणाम शालेय गुणवत्तेवर होत असून विद्यार्थ्यांमध्ये इयत्तानिहाय आणि विषयनिहाय क्षमता संपादित होण्यामध्ये अडचणी निर्माण झालेल्या आहेत . राज्यस्तरावरून ' शाळा बंद पण शिक्षण सुरु " या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांचे शिक्षण ऑनलाईन व ऑफलाईन माध्यमातून सुरु राहावे याकरिता विविध उपक्रम राबविण्यात येत असून विद्यार्थ्यांचा झालेला हा अध्ययन -हास भरून काढण्यासाठी शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यस्तरावरून विकसित केलेल्या ४५ दिवसांच्या सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात आलेली होती . सेतू अभ्यासाची परिणामकारकता तपासण्यासाठी राज्यस्तरावरून संशोधन अभ्यास करण्यात आलेला असून यामध्ये सेतू अभ्यास परिणामकारक असल्याचे निष्कर्ष मिळालेले आहेत . 

💥 शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये शाळा पूर्ण क्षमतेने आणि नियमितपणे सुरु झालेल्या नसल्याने विद्यार्थ्यांना इयत्तानिहाय आणि विषयनिहाय अध्ययन निष्पत्ती संपादन करण्यामध्ये अडसर निर्माण झाले आहेत. त्यामुळे राज्यस्तरावरून शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मध्ये ही सर्वच विद्यार्थ्यांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे . 

💥 पुनर्रचित सेतू अभ्यासाचे स्वरूप : 

🔻१. इयत्ता दुसरी ते दहावीच्या मराठी , इंग्रजी , सामान्य विज्ञान , गणित आणि सामाजिक शास्त्र या विषयांसाठी पुनर्रचित सेतू अभ्यास तयार करण्यात आलेला आहे . 

🔻२. सदर अभ्यास इयत्तानिहाय व विषयनिहाय तयार करण्यात आला असून मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमतांवर आधारित आहे . 

🔻३. पुनर्रचित सेतू अभ्यास हा ३० दिवसांचा ( शालेय कामकाजाचे दिवस ) असून यामध्ये दिवसनिहाय कृतीपत्रिका ( worksheets ) देण्यात आलेल्या आहेत . तसेच सदर अभ्यास मराठी , उर्दू आणि इंग्रजी माध्यमासाठी तयार करण्यात आलेला आहे . 

🔻४. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासाच्या अंमलबजावणीविषयक शिक्षक व विद्यार्थ्यांसाठी सविस्तर सूचना सेतू अभ्यासाच्या सुरुवातीला देण्यात आलेल्या आहेत . 

🔻५. सदर पुनर्रचित सेतू अभ्यासातील कृतीपत्रिका या विद्यार्थीकेंद्रित व कृतीकेंद्रित तसेच अध्ययन निष्पत्ती आधारित आहेत . विद्यार्थी शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली स्वयंअध्ययन करू शकतील असे त्याचे स्वरूप आहे . तसेच अधिक संबोध स्पष्टतेकरिता ई - साहित्याच्या लिंक्स देण्यात आलेल्या आहेत . 

🔻६. सदर सेतू अभ्यासातील विषयनिहाय कृतीपत्रिका प्रत्येक विद्यार्थी दिवसनिहाय सोडवतील याप्रकारे नियोजन देण्यात आलेले आहे 

 🔻७. पूर्व चाचणी आणि उत्तर चाचणीचा यामध्ये समावेश करण्यात आलेला असून उपरोक्त पुनर्रचित सेतू अभ्यास व पूर्व चाचणी परिषदेच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर दि . ९ जून पासून उपलब्ध करून देण्यात येईल . तसेच उत्तर चाचणी दि . २३ जुलै / दि .६ ऑगस्ट , २०२२ पर्यंत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येईल .

💥 पुनर्रचित सेतू अभ्यासाची अंमलबजावणी : 

🔻१. सदर सेतू अभ्यास सर्व व्यवस्थापनाच्या शाळांमधील इयत्ता दुसरी ते दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे . शालेय स्तरावर शाळेचे मुख्याध्यापक यांनी वरील नमूद केलेल्या • कालावधीनुसार सेतू अभ्यासाची अंमलबजावणी करावी 

🔻२. सदर सेतू अभ्यासाला सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांची विषयनिहाय पूर्व चाचणी घेण्यात यावी . उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पूर्व चाचणीतील गुणांच्या नोंदी स्वत: कडे ठेवाव्यात . 

🔻३. मागील इयत्तांच्या महत्वाच्या क्षमता या अभ्यासातून संपादित होतील याकरिता शालेय कामकाजाच्या ३० दिवसांमध्ये सेतू अभ्यासाची अंमलबजावणी आपल्या स्तरावरून काटेकोर पद्धतीने करण्यात यावी . 

🔻४. सदर कृतीपत्रिका ( worksheets ) शिक्षकांनी शालेय वेळापत्रकानुसार संबंधित विषयाच्या तासिकेला सोडवून घ्याव्यात . 

🔻५. शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी त्या त्या दिवसाची कृतीपत्रिका सोडविणे अपेक्षित आहे . या कृतीपत्रिका विद्यार्थी स्वतंत्र वहीमध्ये सोडवू शकतात . 

🔻६. सदर सेतू अभ्यास पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांची विषयनिहाय उत्तर चाचणी घेण्यात यावी. उत्तरपत्रिका तपासून शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या चाचणीतील उत्तर गुणांच्या नोंदी स्वत : कडे ठेवाव्यात . 

🔻७. सदर अभ्यास पूर्ण झाल्यानंतर त्या त्या इयत्तेच्या विषयाची नियमित अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुरु करण्यात यावी . 

💥 पुनर्रचित सेतू अभ्यास २०२२-२३ ची शालेय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करणेबाबतचे शासन परिपत्रक डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा. 👈


Post a Comment

1 Comments