एक्स्प्लोर

Dasara Melava : दसरा मेळाव्याला शिवतीर्थ नाकारलं तर कोर्टात, ताणल्यास थेट मैदानात; शिवसेना आक्रमक

Dasara Melava : शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावल्यास आणि हे प्रकरण आणखी ताणल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत आहे.

Dasara Melava : शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार? हे अद्याप स्पष्ट झालेलं नसताना शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मुंबई महापालिकेने (BMC) शिवसेनेला दसरा मेळाव्यासाठी मैदान नाकारल्यास शिवसेना (Shiv Sena) कोर्टात जाण्याच्या तयारीत आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिकेने निर्णय घेण्यास उशीर लावल्यास आणि हे प्रकरण आणखी ताणल्यास शिवसेना थेट मैदानात उतरुन दसरा मेळावा करण्याच्या तयारीत आहे.

शिवतीर्थावर नेमका दसरा मेळावा कोणाचा होणार, यावर मुंबई महापालिका निर्णय घेणार आहे. या निर्णयाची वाट शिंदे गट आणि ठाकरे गट पाहत आहे. मात्र निर्णय घेण्याआधी विधी व न्याय विभागाचा सल्ला मुंबई महापालिका घेत असल्याची माहिती आहे. मात्र यामध्ये शिवसेनेकडून दसरा मेळाव्यासाठी फक्त आणि फक्त शिवतीर्थ हा एकमेव पर्याय आहे. इतर कुठल्याही मैदानाचा विचार शिवसेना करणार नाही

शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्या दोघांचे अर्ज शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्यासाठी आले आहेत. पहिला अर्ज शिवसेना ठाकरे गटाने केला असल्याने शिवसेनेलाच दसरा मेळावा शिवतीर्थावर घेण्याची परवानगी मिळावी, अशी अपेक्षा शिवसेनेला आहे. मात्र मुंबई महापालिका हे प्रकरण ताणत असून निर्णय घेण्यास उशीर लावत असेल तर दसऱ्याच्या दिवशी थेट शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची तयारी शिवसेनेने दाखवली आहे.

बीकेसीतील मैदान शिंदे गटाला
मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुलातील एमएमआरडीए मैदान मिळावं याकरता शिंदे गटाने केलेला अर्ज 'एमएमआरडीएने स्वीकारला आहे. तर शिवसेनेने ज्या मैदानासाठी अर्ज केला ते आरक्षित असल्याने फेटाळण्यात आलं आहे. शिंदे गटाच्या आमदारांचा अर्ज एमएमआरडीएने स्वीकारल्याने त्यांना मैदान मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. शिवसेनेने बीकेसीतील ज्या मैदानासाठी अर्ज केला होता, ते आधीच आरक्षित आहे. त्यामुळे शिवाजी पार्क दोन्ही गटांना नाकारल्यास शिंदे गटाला बीकेसीचा पर्याय उपलब्ध असेल, हे स्पष्ट झालं आहे.  

दसरा मेळाव्याला शिवाजी पार्क मैदान रिकामं राहणार? 
शिवसेना आणि शिवाजी पार्क मैदानावरील दसरा मेळावा हे समीकरण आहे. परंतु शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडखोरीमुळे यंदा शिवसेना आणि शिंदे गट यांच्यात मेळाव्यासाठी चुरस निर्माण झाली आहे. शिवाजी पार्क मैदान मिळावं यासाठी शिवसेनेबरोबरच शिंदे गटानेही अर्ज केला आहे. मात्र शिवतीर्थ  कोणाला मिळणार हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न विचारात घेऊन महापालिका दोन्ही गटांना परवानगी नाकारण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास बीकेसीतील एमएमआरडीएच्या मैदानावर मेळावा घेण्याचा पर्याय शिंदे गटापुढे असणार आहे, तर शिवसेनेची मात्र कोंडी होण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Special report BJP Jahirnama:काँग्रेस, भाजपचा जाहीरनामा प्रसिद्ध,प्रादेशिक पक्षांचे जाहीरनामे कधी ?Uddhav Thackeray :शिवसेना ठाकरे गटाचं मशाल गीत प्रदर्शित ABP MajhaMaharashtra Superfast News : महाराष्ट्रातील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 16 April 2024Vaishali Darekar Kalyan Loksabha : वैशाली दरेकरांच्या प्रचार रॅलीत गणपत गायकवाडांच्या पत्नी सहभागी

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
जोस द बॉस.... बाजीगर बटलरचं  झंझावती शतक, राजस्थानचा केकेआरवर सनसनाटी विजय!
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
यंदा गुजरात होणार चॅम्पियन, आरसीबी 2029 मध्ये उंचावणार चषक, AI नं जारी केली विजेत्याची लिस्ट 
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
मोठी बातमी: ठाकरेंचा हमखास निवडून येणारा उमेदवार संकटात, ओमराजे निंबाळकरांच्या उमेदवारी अर्जात मोठी चूक, अर्ज बाद होण्याची भीती
Sangli Loksabha: विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
विशाल पाटलांसाठी सत्यजित तांबे मैदानात उतरले, वसंतदादांचा वारसा सांगत म्हणाले...
Kalyan Loksabha: कल्याणमध्ये भाजप आमदाराची पत्नी वैशाली दरेकरांच्या प्रचारात, गावभर बोभाटा होताच म्हणाल्या...
कल्याणमध्ये भाजप आमदाराची पत्नी वैशाली दरेकरांच्या प्रचारात, गावभर बोभाटा होताच म्हणाल्या...
ABP C-Voter Survey : नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नाशिकसह उत्तर महाराष्ट्रातील मतदारसंघात कोण गुलाल उधळणार? एबीपी माझाचा ओपिनियन पोल काय सांगतो?
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
नारायणचं वादळी शतक, कोलकात्याचं राजस्थानसमोर 224 धावांचं आव्हान
ABP Majha C voter opinion poll: मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
मुंबईत उद्धव ठाकरेंना मोठा झटका, एकाही जागेवर विजय नाही; भाजप-शिंदे गट क्लीन स्वीप देणार?
Embed widget