एक्स्प्लोर

Agri Innovation: वडील डॉक्टर अन् मुलगा शेतकरी... युट्युबवरुन शिकला स्ट्रॉबेरी फार्मिंग; आता करतोय लाखोंची कमाई

Strawberry Cultivation: शेतीकडे तरुणांचा कल झपाट्याने वाढत आहे. या एपिसोडमध्ये, सोनीपतमधील एक तरुण स्ट्रॉबेरीच्या लागवडीत संपत्ती आणि प्रसिद्धी मिळवत आहे. या उत्कटतेनं लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

Strawberry Cultivation: शेतीकडे (Agriculture News) तरुणांचा कल झपाट्यानं वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. आता अशाच एका तरुणाची हटके कहाणी समोर आली आहे. हा तरुण देशात स्ट्रॉबेरीच्या लागवडीतून (Cultivation of strawberries) उत्पन्नासोबतच मोठं नाव कमवत आहे. सोशल मीडियावरुण (Social Media) तरुणावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. 

आपल्या देशातील तरुणाई आपली खरी ताकद असल्याची वक्तव्य अनेक दिग्गजांच्या तोंडून आपण ऐकतो. याची प्रचिती हरियाणातील (Haryana) एका युवकाच्या कहाणी ऐकून येते. हरियाणा म्हणजे, गहू, तांदळासाठी ओळखलं जाणारं राज्य. गेल्या काही वर्षात हरियाणानं इतर राज्यांच्या तुलनेत कृषी क्षेत्रात चांगली कामगिरी केली आहे. इथल्या शेतकर्‍यांसोबतच नव्यानं शेती व्यवसायाकडे वळलेले तरुण शेतीला जोडून काहीतरी नव नवीन प्रयोग करत आहेत. असंच एक नाव म्हणजे, सोनीपत जिल्ह्यातील चिताना गावात राहणारा अंकित. अंकितचे वडील व्यवसायानं डेंटल फिजिशियन आहेत. मात्र अंकितनं आपलं करिअर म्हणून शेतीची निवड केली. त्यानं कोणतीही मोठी पदवी, नोकरी, व्यवसाय याऐवजी शेती व्यवसायात आपलं नशीब आजमावण्याचं ठरवलं. 

Agri Innovation: वडील डॉक्टर अन् मुलगा शेतकरी... युट्युबवरुन शिकला स्ट्रॉबेरी फार्मिंग; आता करतोय लाखोंची कमाई

Strawberry Farming : युट्यूबवर पाहून स्ट्रॉबेरी फार्मिंग

सोनीपतच्या चिताना गावात राहणारा अंकित सध्या स्ट्रॉबेरीची शेती (Strawberry Farming) करत आहे. अंकितने स्ट्रॉबेरी लागवडीचं कोणतंही वेगळं प्रशिक्षण घेतलेलं नाही. मात्र आज तो यूट्यूबवरून स्ट्रॉबेरी फार्मिंगचे धडे गिरवत आहे. एवढंच नाहीतर अंकित यातून लाखोंची कमाईही करत आहे. 

अंकितनं स्ट्रॉबेरी फार्मिंग साधारणतः 5 वर्षांपूर्वी सुरू केलं. त्यापूर्वी अंकितनं यूट्यूबवरूनच स्ट्रॉबेरी पिकवण्याचं नवं तंत्र शिकून घेतलं. रोज नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती मिळवून अंकित स्ट्रॉबेरी फार्मिंगचं नियोजन आखत होता. त्यानंतर अंकितनं सर्व गोष्टींचा अभ्यास करुन स्ट्रॉबेरी फार्मिंगला सुरुवात केली. बघता बघता अंकितचा प्रयोग यशस्वी होत गेला. बघता बघता तालुका, जिल्हा आणि संपूर्ण राज्यात अंकितच्या स्ट्रॉबेरी फार्मिंगबाबत माहिती पसरली. त्याच्या यशस्वी प्रयोगाबाबत सर्वांना समजू लागल्यावर त्यांनी आपापल्या शेतातही अंकितनं राबवलेले प्रयोग करुन पाहिले. स्ट्रॉबेरीची शेती केली. आज त्यांना स्ट्रॉबेरी फार्मिंगमधून चार ते पाच लाख रुपयांचा नफा मिळत आहे. 

Agri Innovation: वडील डॉक्टर अन् मुलगा शेतकरी... युट्युबवरुन शिकला स्ट्रॉबेरी फार्मिंग; आता करतोय लाखोंची कमाई

Strawberry Cultivation News : कशी झाली सुरुवात? 

नवभारत टाईम्सच्या रिपोर्टनुसार, अंकित ग्रॅज्युएशनसोबतच स्ट्रॉबेरी फार्मिंग करत आहे. सुमारे 2 वर्षांपूर्वी त्यानं 2 एकर जमिनीवर स्ट्रॉबेरी पिकवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सात ते आठ लाख रुपये खर्चही करण्यात आले. आज अंकित केवळ चांगली कमाई करून स्वावलंबी झाला नाही, तर त्याच्या कल्पनेमुळे गावातील अनेक लोकांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. 

स्ट्रॉबेरी हे असं फळ आहे, ज्याला नेहमीच मागणी असते. यामुळेच अंकितला त्याच्या मार्केटिंगमध्ये कोणतीही अडचण आलेली नाही. आता खरेदीदार फोनवरच ऑर्डर बुक करतात. महत्त्वाचं गोष्ट म्हणजे, आता शेतीत होणाऱ्या खर्चापेक्षा उत्पन्न जास्त आहे. म्हणजेच, भांडवलापेक्षा जास्त नफा मिळतोय. 

Strawberry Farming News : पारंपारिक पिकांपेक्षा जास्त नफा

माध्यमांशी बोलताना अंकितनं सांगितलं की, "पारंपरिक पिकांच्या तुलनेत स्ट्रॉबेरीची लागवड करून चांगलं उत्पन्न मिळवता येतं. आपले पूर्वज गहू-भात पिकातून जेवढी कमाई करू शकले नाहीत, तेवढे ते स्ट्रॉबेरी पिकातून कमावत आहेत. आजच्या काळात तरुणांना नोकऱ्या मिळणंही कठीण झालं आहे. स्ट्रॉबेरी पिकवून आम्ही लोकांना रोजगारही देत ​​आहोत." दरम्यान, जिथे केवळ नोकरी-व्यवसाय हेच यशाचं आणि सुखी जीवनाचं साधन मानलं जातं, तिथे आज अंकितसारखे अनेक तरुण विचार बदलण्याचं काम करत आहेत.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Agriculture News : माळशिरसमध्ये सेंद्रिय पपई शेतीचा यशस्वी प्रयोग, 21 ते 22 लाख रुपयांचं उत्पन्न मिळणार 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dubai floods : दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा
''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा
Harshvardhan Patil: फडणवीसांनी समजूत काढल्यानंतर बारामतीत हर्षवर्धन पाटील सक्रिय; सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी 300 गाड्या घेऊन पुण्यात
फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील ॲक्शन मोडमध्ये, सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी 300 गाड्या घेऊन पुण्यात
Kishori Pednekar : कथित बॉडीबॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किरोशी पेडणेकरांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
कथित बॉडीबॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किरोशी पेडणेकरांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Madha Lok Sabha Aniket Deshmukh : माढामधून डॉ.अनिकेत देशमुख अपक्ष उमेदवारी अर्ज भरणारAmol Kolhe LokSabha Election : शिरूर लोकसभेसाठी डॉ. अमोल कोल्हेंचा उमेदवारी अर्ज दाखलAmit Shah On Loksabha : नरेंद्र मोदी 400 पार करून पुन्हा पंतप्रधान होणार, अमित शहांना विश्वासPune Supriya Sule : प्रचाराचा धडाका, मविआकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dubai floods : दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
दुबईची तुंबई का झाली; कृत्रिम पाऊस अंगलट आला की हवामान बदलाने दणका दिला? नेमकं काय घडलं??
''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा
''भाषण सुरू होताच उमेदवार खाली जाऊन बसले''; जयंत पाटलांनी काढला चिमटा
Harshvardhan Patil: फडणवीसांनी समजूत काढल्यानंतर बारामतीत हर्षवर्धन पाटील सक्रिय; सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी 300 गाड्या घेऊन पुण्यात
फडणवीसांच्या भेटीनंतर हर्षवर्धन पाटील ॲक्शन मोडमध्ये, सुनेत्रा पवारांचा अर्ज भरण्यासाठी 300 गाड्या घेऊन पुण्यात
Kishori Pednekar : कथित बॉडीबॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किरोशी पेडणेकरांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
कथित बॉडीबॅग घोटाळ्यात ठाकरे गटाच्या किरोशी पेडणेकरांना मोठा दिलासा, उच्च न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
बुमराह, सूर्या की रोहित, अर्शदीप, कुणाला कॅप्टन कराल? PBKS vs MI सामन्यात मालामाल करणारे 11 खेळाडू 
बुमराह, सूर्या की रोहित, अर्शदीप, कुणाला कॅप्टन कराल? PBKS vs MI सामन्यात मालामाल करणारे 11 खेळाडू 
दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन् बायकोला घालतात, पाकीटमार कधीतरी पकडला जातो; आव्हाडांची अजितदादांवर टीका
दरोडेखोर मंगळसूत्र घेऊन जातात अन् बायकोला घालतात, पाकीटमार कधीतरी पकडला जातो; आव्हाडांची अजितदादांवर टीका
Telly Masala :  मकरंद अनासपुरे CM झाल्यास कोणता निर्णय घेणार ते कलर्स मराठीवरील ही मालिका जाणार ऑफएअर; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
मकरंद अनासपुरे CM झाल्यास कोणता निर्णय घेणार ते कलर्स मराठीवरील ही मालिका जाणार ऑफएअर; जाणून घ्या मराठी मनोरंजनसृष्टीसंबंधित बातम्या
IPL 2024: ऑरेंज कॅप स्पर्धेत कोहलीच किंग, पर्पल कॅपची लढत रोमांचक 
IPL 2024: ऑरेंज कॅप स्पर्धेत कोहलीच किंग, पर्पल कॅपची लढत रोमांचक 
Embed widget