एक्स्प्लोर

Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!

कोल्हापूरच्या रांगड्या भूमीत फुटबाॅल गेल्या 92 वर्षांपासून रुजला आहे. कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते. कोल्हापूर अनेक पारंपारिक खेळांचे माहेरघर आहे ज्यांनी आपले कौशल्य आणि प्रतिभा दाखवली आहे.

Kolhapur Football : ज्या कोल्हापूरच्या भूमीने वैचारिक वारसा दिला....मराठी चित्रपटसृष्टीचा पाया रचला... ज्या भूमीने खाद्यसंस्कृती दिली... ज्या भूमीने मल्ल दिले.. ज्या भूमीने नेमबाज, जलतरणपटू दिले....त्याच कोल्हापूरच्या रांगड्या भूमीत फुटबाॅल सुद्धा गेल्या 90 वर्षांपासून रुजला आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरला फुटबॉलची पंढरी समजली जाते. भारतीय क्रिकेट संघाने मोठी मालिका जिंकल्यानंतर किंवा पाकिस्तानला नमवल्यानंतर जसा शिवाजी चौकात कोल्हापूरकरांचा हक्काचा जल्लोष असतोच, पण त्याच्या कैकपटीने अधिक रोमांच, ईर्ष्या, संघर्ष गल्लोगल्लीमध्ये फुटबाॅलसाठी दिसतो.

Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!

कोल्हापूर अनेक खेळांचे माहेरघर आहे. त्यांनी आपल्या पराक्रमाने आणि चमकदार कामगिरीने केवळ राष्ट्रीय क्रीडा जगतावरच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावरही छाप सोडली आहे. पहिले ऑलिम्पिक पदक विजेते खाशाबा जाधव यांनी कोल्हापूरला क्रीडा नकाशावर आणले. अर्जुन पुरस्कारप्राप्त स्व. गणपतराव आंधळकर, शैलजा साळोखे, तेजस्विनी सावंत, राही सरनोबत, वीरधवल खाडे, अनिकेत जाधव, निखिल कदम आणि यंदा जलतरणातही स्वप्निल पाटील याने अर्जुन पुरस्कार मिळवला. त्याआधी ऑगस्टमध्ये कोल्हापूरच्या अनिकेत जाधवला तब्बल 2 कोटी 35 लाखांचे मानधन देत ईस्ट बंगाल फुटबॉल क्लबने करारबद्ध केले. 17 वर्षांखालील विश्वचषक फुटबॉल स्पर्धेतही त्याने आपली छाप सोडली होती. 

लाल मातीतील कुस्तीत रंगणाऱ्या कोल्हापूरमध्ये फुटबाॅल कसा 'फेमस' झाला?

कतारमधील फुटबाॅल वर्ल्डकप अवघ्या काही दिवसांवर आला असतानाच कोल्हापूरचाही फुटबाॅल हंगाम सज्ज होत आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून शाहू स्टेडियम रोमांच अनुभवणार आहे. आगामी हंगामासाठी 348 खेळाडू करारबद्ध झाले असून यामध्ये 24 परदेशी खेळाडूंचा समावेश आहे. यावरून कोल्हापूरच्या फुटबाॅलची क्रेझ लक्षात येते. त्यामुळे तालीम तर आलीच पण प्रत्येक कट्ट्यावरही फुटबाॅलचे बारकावे, मेस्सी, रोनाल्डोचे किस्से, त्यांच्यावरील निर्व्याज प्रेम आणि कोल्हापुरी भाषेतील उद्धार सुद्धा सहजपणे कानावर येतो. त्यामुळेच की काय कोल्हापूर शहरामधील अनेक भिंतींवरील कटआऊट, दुकाने, गाड्यांची हेडलाईट सजून गेली आहेत. 

Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!

कोल्हापुरात फुटबाॅल एकदम खोल विषय कसा झाला? या प्रश्नाचे उत्तरे शोधायचे असल्यास थोडं मागं जावं लागेल. करवीर नगरीचा लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांनी कुस्तीला राजाश्रय देत जशी देशपातळीसह जागतिक पातळीवर नेली, अगदी त्याच पद्धतीने कोल्हापूरच्या छत्रपती राजाराम महाराजांनी फुटबाॅलचा पाया रचला. त्यांनी 92 वर्षांपूर्वी लावलेल्या वृक्षाचा आता वटवृक्ष झाला आहे. या सावलीत अनिकेत जाधवसारखे हिरे तयार झालेत. 1930 पासून या मातीत अनेक खेळाडू होऊन गेले. आपल्या लाडक्या तालमीची, क्लबची कर्तबगारी पाहण्यासाठी शाहू स्टेडियमवर हजारोंच्या घरात गर्दी होते. या गर्दीने काहीवेळा देदीप्यमान इतिहासाला तडा सुद्धा गेला आहे. 

कोल्हापूरमध्ये स्पर्धा कशा होतात?

कोल्हापूर जिल्ह्यात कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन ही सर्वोच्च संस्था आहे. दिवाळी झाल्यानंतर कोल्हापूरच्या फुटबाॅल हंगामाचे वेध लागतात. कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशन स्पर्धा भरवल्यानंतर टायटल स्पाॅन्सर घेऊन स्पर्धा भरवल्या जातात. जवळपास सहा महिने हंगाम चालतो. या हंगामात तालीम आणि क्लबमधील ईर्ष्या मैदानातही दिसून येते. त्यामध्ये पेठा सुद्धा कमी नाहीत. शाहू महाराजांच्या घराण्याकडून फुटबाॅलसाठी दिलेला हात सुद्धा फार तोलामोलाचा आहे.अखिल भारतीय फुटबॉल महासंघाने वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या सहकार्याने सी आणि डी परवाना फुटबॉल प्रशिक्षक प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात आला आहे. आज जिल्ह्यात 4 सी परवाना प्रमाणपत्र उत्तीर्ण तर 48 डी परवाना प्रमाणपत्र फुटबॉल प्रशिक्षक उत्तीर्ण झालेले आहेत. 

Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!

मालोजीराजे छत्रपती फुटबाॅल फेडरेशनचे सदस्य 

दोन महिन्यांपूर्वीच कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष मालोजीराजे छत्रपती (Malojiraje Chhatrapati) यांची ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनच्या (All India Football Federation) कार्यकारिणी सदस्यपदी निवड झाली आहे. त्यांच्या रुपाने कोल्हापूरला पहिल्यांदाच बहुमान मिळाला आहे. मालोजीराजे छत्रपती वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन उपाध्यक्षही आहेत. मालोजीराजे छत्रपती गेली दहा वर्षांपासून वेस्ट इंडिया फुटबॉल असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत. त्यांच्या निवडीने कोल्हापूरच्या फुटबॉल क्षेत्रात चैतन्याचे वातावरण आहे. 

भारतीय फुटबॉल महासंघाच्या अध्यक्षांकडूनही कोल्हापूरचा विशेष उल्लेख 

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे नवनियुक्त अध्यक्ष कल्याण चौबे यांनी इंडियन सुपर लिगच्या नवव्या पर्वाच्या  उद्‍घाटनप्रसंगी केरळमध्ये बोलताना बंगाल, केरळबरोबरच कोल्हापुरात देखील फुटबॉल चाहत्यांची मोठी संख्या असल्याचा विशेष उल्लेख केला होता. चौबे म्हणतात, देशात फुटबॉलचे मोठे चाहते आहेत. मुख्यतः केरळ, बंगाल, ईशान्येकडील राज्ये, तसेच महाराष्ट्रातील कोल्हापुरात देखील प्रचंड संख्येने चाहते सामन्यांसाठी हजेरी लावतात. त्यामुळे चाहत्यांना अधिकाधिक रोमांचक सामने आणि सुविधा मिळवून देण्यासाठी प्रयत्नात आहे. मालोजीराजे छत्रपती यांनी कोल्हापूरमधील क्रेझ पाहण्यासाठी चौबे यांना आमंत्रित केले आहे.

Kolhapur Football : कुस्ती, नेमबाजी, स्विमिंग आहेच, पण रांगड्या कोल्हापुरात फुटबॉल 92 वर्षांपासून एकदम 'खोल' विषय आहे!

नव्या हंगामासाठी 348 खेळाडू करारबद्ध

प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर कोल्हापूरचा फुटबाॅल हंगाम पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. नव्या हंगामासाठी वरिष्ठ गटातील 16 संघासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील 322 खेळाडू आहेत. देशांतर्गत 22 व परदेशी 24 खेळाडू करारबद्ध झाले आहेत. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हंगाम सुरु होण्याची शक्यता आहे.  

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Narendra Modi : 70 वर्षांवरील नागरिकांना 5 लाखांपर्यंतचे उपचार मोफत, मोदींची सर्वात मोठी घोषणा!Lok Sabha Elections Phase 1 : लोकसभेच्या पहिल्या टप्प्याचं मतदान पूर्ण, राज्यात किती टक्के मतदान?Nashik Lok Sabha : भुजबळ गेले बोरस्ते आले...हेमंत गोडसे यांची आव्हानं संपेना ABP MajhaABP Majha Headlines : 08 PM : 19 April 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
रचिन गोल्डन डकचा शिकार, लखनौच्या गोलंदाजानं उडवला त्रिफाळा!
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
IPL 2024 : 6 संघावर एकटा रोहित शर्मा भारी, हिटमॅनचे आकडे पाहून तुम्हालाही वाटेल अभिमान 
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
लोकसभेच्या धामधुमीत राजेश टोपेंना मोठा धक्का, कट्टर समर्थकांचा अजितदादांच्या राष्ट्रवादीत प्रवेश
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
''बाबासाहेब आले तरी घटना बदलणार नाही''; PM मोदींच्या विधानावर आंबेडकरांचा पलटवार
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
शाहू महाराज की उदयनराजे भोसले, कोणत्या राजांची संपत्ती अधिक?
माहीभाईचा जलवा कायम, धोनीची झलक पाहायला चाहत्यांची झुंबड, व्हायरल व्हिडीओ एकदा पाहाच
चेन्नई, मुंबई ते लखनौ महेंद्रसिंह धोनीचा जलवा कायम, एकाना स्टेडियमवर चाहत्यांचा जनसागर, व्हिडीओ व्हायरल
Lok Sabha Election 2024 Phase 1 Voting : लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
पहिल्या टप्प्यातील मतदानात त्रिपुरा अन् बंगालमध्ये सर्वाधिक चुरस; महाराष्ट्रात काय घडलं?
Hrithik Roshan and Jr NTR War 2 Movie :  हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
हृतिक- ज्यू. एनटीआरच्या चित्रपटाला हॉलिवूडचा तडका; 'कॅप्टन अमेरिका'चा स्टंट डायरेक्टर 'यशराज'च्या चित्रपटात
Embed widget