एक्स्प्लोर

ICC T20 WC 2022, IND vs ZIM: भारताची सेमीफायनलमध्ये दिमाखात एन्ट्री, झिम्बाब्वेवर 71 धावांनी मोठा विजय

IND vs ZIM, Match Highlights : टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील अखेरच्या साखळी सामन्यात भारताने झिम्बाब्वेला मात देत थेट सेमीफायनल गाठलं आहे.

IND vs ZIM, T20 World Cup 2022 : टी20 विश्वचषक स्पर्धेत (T20 World Cup 2022) भारतही सेमीफायनलमध्ये पोहोचला असून सर्वाधिक गुण घेत भारतानं सेमीफायनल गाठली आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताने 71 धावांनी विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे (IND vs ZIM) सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. ज्यात भारतानं केएल राहुल आणि सूर्यकुमारच्या (Suryakumar Yadav) अर्धशतकांच्या जोरावर 186 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 115 धावांत झिम्बाब्वेला सर्वबाद करत भारतानं 71 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताचे गुणतालिकेत 8 गुण झाले असून दोन्ही ग्रुपमधील संघामध्ये भारताचेच गुण सर्वाधिक आहेत. भारतानं केवळ एक साखळी सामना (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) गमावला असून इतर सर्व सामने जिंकले आहेत.

सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारतानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत कमाल कामगिरीमुळे भारत आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता, त्यामुळे आजचा सामना औपचारिकता होती. तरीही एक मोठा विजय मिळवून सेमीफायनलमध्ये एन्ट्री करायची यासाठी कर्णधार रोहितनं पहिली फलंदाजी घेतली. ज्यानंतर रोहित आणि राहुल मैदानात आले, पण रोहित 15 धावा करुनच तंबूत परतला. कोहलीही 26 धावा करुन बाद झाला. पण राहुलने आज संयमी फलंदाजी करत 51 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारनं क्रिजवर आल्यापासून फटकेबाजी कायम ठेवली. त्याला पांड्याने 18 धावांची मदत करत एक चांगली भागिदारी उभारली. सामन्यात अवघ्या 25 बॉलमध्ये नाबाद 61 धावा करत सूर्यकुमारने भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली.

सिकंदर रझाची झुंज व्यर्थ

187 धावांचं आव्हान गाठण्यासाठी मैदानात आलेल्या झिम्बाब्वे संघाची सुरुवातच खराब झाली. पहिल्याच बॉलवर त्यांचा सलामीवीर वेस्ले भुवीच्य बोलिंगवर कोहलीच्या हाती झेलबाद झाला. त्यानंतर झिम्बाब्वेचे विकेट्स पडणं कायम होतं. भारताच्या गोलंदाजीसमोर झिम्बाब्वेचा कोणताच फलंदाज टिकू शकत नव्हता. पण त्यांचा स्टार फलंदाज सिकंदर रझा (34) याने मात्र एकहाती झुंज दिली. त्याला आर. बर्ल (35) यानेही चांगली साथ दिली. पण अखेर दोघेही संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अवघ्या 115 धावांत झिम्बाब्वेचा संघ सर्वबाद झाला आणि भारतानं 71 धावांनी विजय मिळवला. आता भारताची सेमीफायनलमध्ये झुंज इंग्लंडविरुद्ध 10 नोव्हेंबर रोजी असणार आहे. 

हे देखील पाहा-

Arshdeep Singh Life Story : वडील कॅनडाला पाठवत होते, पण गड्यानं एक वर्ष मागितलं आणि इतिहास घडवला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Sanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?
शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? यादीत कुणाकुणाची नावं?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Govinda Ahuja to Join CM Eknath Shinde Shiv Sena : अभिनेता गोविंदा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करणारShinde Group Loksabha Election 2024 : शिंदे गटाच्या 13 पैकी 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणारSanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?Rashmi Barve :  जातवैधता प्रमाणपत्र संदर्भात रश्मी बर्वेंना तातडीचा दिलासा देण्यास नकार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kareena Kapoor Karishma Kapoor : करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
करिष्मा आणि करिना कपूर राजकारणाच्या आखाड्यात? दोन्ही अभिनेत्री वर्षा बंगल्यावर दाखल, चर्चांना उधाण
Shiv Sena : निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
निगेटिव्ह सर्व्हेच्या नावावर शिंदेंच्या जागा भाजपकडून बळकण्याचं सत्र, मग विधानसभेचं काय? शिवसेनेचे आमदार नाराज
Nashik Lok Sabha : उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
उमेदवारी न मिळाल्याने विजय करंजकर नाराज, राजाभाऊ वाजेंनी उद्धव ठाकरेंशी चर्चा करत घेतला मोठा निर्णय
Sanjay Shirsat on Lok Sabha : शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? कुणाकुणाची नावं?
शिंदेंच्या 12 खासदारांना पुन्हा संधी मिळणार? यादीत कुणाकुणाची नावं?
'पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जातेय'; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
'पैसे घेऊन नाना पटोलेंकडून उमेदवारी दिली जातेय'; काँग्रेसच्या माजी आमदाराचा गंभीर आरोप
Arvind Kejriwal on ED : 'आप'ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू; अरविंद फार्माने 55 कोटींचे निवडणूक रोखे भाजपला दिले; केजरीवालांचा गौप्यस्फोट
'आप'ला ठेचणे, खंडणी रॅकेट तयार करणे हा ईडीचा हेतू; अरविंद केजरीवालांचा ईडीवर गंभीर आरोप
RR Vs DC Dream11 prediction: जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
जैस्वाल, बटलर, वॉर्नर, कोणाला बनवाल कर्णधार?; 11 खेळाडूंची परफेक्ट टीम, तुम्हाला करेल मालामाल
Nashik Lok Sabha : विजय करंजकर सकल मराठा समाजाचे उमेदवार? नाशकात वाजे विरुद्ध करंजकर लढत?
विजय करंजकर सकल मराठा समाजाचे उमेदवार? नाशकात वाजे विरुद्ध करंजकर लढत?
Embed widget