एक्स्प्लोर

'रुरल जुगाड स्पर्धेत' मराठवाड्याच्या पोरानं मारली बाजी; अक्षय देशातून पहिला, शेतमाल वाहतुकीसाठी भन्नाट जुगाड

ग्रामीण आविष्कारांना आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत सामाजिक प्रभाव निर्माण करू शकेल अशा कल्पना, उत्पादन असलेल्या स्टार्टअप्सकरिता या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  

Aurangabad News Updates: सीआयआय यंग इंडिअन्स संस्थेच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेल्या ‘रुरल जुगाड स्पर्धेत’ ( Rural Jugad Competition )मॅजिकच्या जिजाई ट्रेलर आणि इक्विपमेंट या स्टार्टअप्सने पहिले पारितोषिक पटकावले आहे. ग्रामीण आविष्कारांना आपल्या उत्पादनाच्या माध्यमातून शाश्वत सामाजिक प्रभाव निर्माण करू शकेल अशा कल्पना, उत्पादन असलेल्या स्टार्टअप्सकरिता या राष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.  

ग्रामीण भागातील विविध समस्यांचे निराकरण करणाऱ्या नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सना निवडून, नेटवर्किंगद्वारे त्यांना उप्तादन विकसित करण्यासाठी मदत केली जाणार आहे. यासाठी सीआयआयने यंग इंडिअन्स संस्थेच्या देशपातळीवरील 52  केंद्रांच्या माध्यमातून स्पर्धेकरिता सहभाग आमंत्रित केलं होतं. यामध्ये मॅजिकचे दोन स्टार्टअप्स यंग इंडिअन्स-औरंगाबाद केंद्राच्या माध्यमातून सहभागी झाले होते. ग्रासरूट इनोव्हेशनवर काम करणारे या दोन्ही स्टार्टअप्सनी स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.

या स्पर्धेतील पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार औरंगाबाद येथील मॅजिक संस्थेत इन्क्युबेट होत असलेल्या असलेल्या अक्षय चव्हाण या नवउद्योजकाच्या ‘जिजाई ट्रेलर आणि इक्विपमेंट कंपनी’ने पटकावला आहे. अक्षय यांनी ‘सेल्फ ड्राइव्ह हेवी ड्युटी ट्रेलर’ने ट्रॅक्टर आणि ट्रॉली याची क्षमता वाढणारे उत्पादन विकसित केले असून, या उत्पादनाचा मोठा फायदा शेतमाल वाहतुकीदरम्यान होणार आहे. सध्या वापरात असलेल्या वाहनांमध्ये जास्त भारामुळे इंधनाचा वापर जास्त होतो तसेच वाहतूक प्रक्रियेला वेळ लागतो.

दुहेरी ट्रेलर वाहून नेणे असुरक्षित आहे आणि अपघाताची शक्यता

दुहेरी ट्रेलर वाहून नेणे असुरक्षित आहे आणि अपघाताची शक्यता वाढवतात. घाट रस्त्यावर चालवणे धोकादायक आहे आणि जास्त भार खेचल्यामुळे देखभाल खर्च वाढतो तसेच दुप्पट लांबीच्या आकारामुळे रस्त्यावर वाहन चालवणे नेहमीच कठीण असते. यावर उपाय म्हणून अक्षयने स्वतः विकसित केले 12 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्स आणि अतिरिक्त ब्रेक चेंबर ट्रॅक्टर हायड्रॉलिक जोडला, मोठ्या आकाराच्या ट्रॉलीमुळे माल वाहन क्षमता 25 टन वाढून 35-40 टन होणार आहे. तसेच वाहन क्षमतेमध्ये सुधार होऊन ट्रॅक्टरची 40% पर्यंत इंधनाची बचत होणार आहे.

मॅजिकचे संचालक सुनील रायथत्ता म्हणाले कि ग्रामीण भागातून येणाऱ्या स्टार्टअप्सना या स्पर्धेतून मोठे व्यासपीठ मिळवण्याची, तसेच आपले उत्पादन अधिकाधिक लोकांपर्यंत नेण्याची संधी उपलब्ध झाली आहे.या पुरस्काराबद्दल बोलतांना अक्षय म्हणाला कि, शेती उपयोगी उत्पादन विकसित करण्याचा प्रयत्न केला, शेतकऱ्यांना आपल्या मालाची वाहतुकीसाठी येणाऱ्या समस्या याबद्दल ट्रॅक्टर आणि ट्रॉली जोडणारा उत्पादन विकसित केला. हा पुरस्कार मला भविष्यात अधिक चांगले काम करण्यासाठी प्रेरणा देईल असे मत त्यांनी मांडले. या संपूर्ण प्रवासात मॅजिकने उत्पादन विकसित करण्यासाठी मोलाची मदत केली असल्याचे त्यांनी नमूद केले.

इतर महत्वाच्या बातम्या

मोठी बातमी! औरंगाबादमधील पीएफआय कार्यालय पोलिसांकडून सील, राज्यातील पहिलीच कारवाई

मुले पळवणारी टोळी समजून दोघांना मारहाण, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने मोठा अनर्थ टळला

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Horoscope Today 18 May 2024 : मेष, कन्यासह 'या' राशींवर असेल शनीची कृपा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, कन्यासह 'या' राशींवर असेल शनीची कृपा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Bollywood Movie : पाच लाख शेतकऱ्यांनी दोन-दोन रुपये जमवून बनवला चित्रपट, आता 48 वर्षांनी 'कान्स'मध्ये होणार स्पेशल शो; तुम्ही पाहिलाय का चित्रपट?
पाच लाख शेतकऱ्यांनी दोन-दोन रुपये जमवून बनवला चित्रपट, आता 48 वर्षांनी 'कान्स'मध्ये होणार स्पेशल शो; तुम्ही पाहिलाय का चित्रपट?
मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
Health : स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरताय तर सावधान! कर्करोगाचा धोका वाढतोय, ICMR ने सांगितले, किती दिवस जुने तेल वापरता येईल?
Health : स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरताय तर सावधान! कर्करोगाचा धोका वाढतोय, ICMR ने सांगितले, किती दिवस जुने तेल वापरता येईल?
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 07.00 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सTOP 100 : टॉप 100 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 100 न्यूज : 18 May 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 6.30 AM : 18 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSharmila Thackeray : बाळासाहेबांची 'ती' इच्छा पूर्ण करा, राज ठाकरेंच्या भाषणावर पत्नीची प्रतिक्रिया

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Horoscope Today 18 May 2024 : मेष, कन्यासह 'या' राशींवर असेल शनीची कृपा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
मेष, कन्यासह 'या' राशींवर असेल शनीची कृपा; इतर राशींसाठी आजचा दिवस कसा असणार? वाचा राशीभविष्य
Bollywood Movie : पाच लाख शेतकऱ्यांनी दोन-दोन रुपये जमवून बनवला चित्रपट, आता 48 वर्षांनी 'कान्स'मध्ये होणार स्पेशल शो; तुम्ही पाहिलाय का चित्रपट?
पाच लाख शेतकऱ्यांनी दोन-दोन रुपये जमवून बनवला चित्रपट, आता 48 वर्षांनी 'कान्स'मध्ये होणार स्पेशल शो; तुम्ही पाहिलाय का चित्रपट?
मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
मुंबईचा शेवटही पराभवानेच, लखनौचा 18 धावांनी विजय, रोहितचं अर्धशतक व्यर्थ
Health : स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरताय तर सावधान! कर्करोगाचा धोका वाढतोय, ICMR ने सांगितले, किती दिवस जुने तेल वापरता येईल?
Health : स्वयंपाकाचं तेल पुन्हा पुन्हा वापरताय तर सावधान! कर्करोगाचा धोका वाढतोय, ICMR ने सांगितले, किती दिवस जुने तेल वापरता येईल?
RCB vs CSK : प्लेऑफसाठी फायनल लढत, आरसीबी अन् चेन्नईची काटें की टक्कर, प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट
RCB vs CSK : प्लेऑफसाठी फायनल लढत, आरसीबी अन् चेन्नईची काटें की टक्कर, प्लेईंग 11 अन् पिच रिपोर्ट
Raj Thackeray PM Modi Meet : मोदींनी बोलावलं, देवेंद्रंनी हात धरुन पुढे आणलं; राज ठाकरेंना खास मान
Raj Thackeray PM Modi Meet : मोदींनी बोलावलं, देवेंद्रंनी हात धरुन पुढे आणलं; राज ठाकरेंना खास मान
निकोलस पूरनचं वादळ, लखनौचं मुंबईसमोर 215 धावांचे विराट आव्हान
निकोलस पूरनचं वादळ, लखनौचं मुंबईसमोर 215 धावांचे विराट आव्हान
Uddhav Thackeray Speech : घराणेशाही ते मराठी-गुजराती , उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
घराणेशाही ते मराठी-गुजराती , उद्धव ठाकरेंच्या भाषणातील महत्त्वाचे 10 मुद्दे
Embed widget