Latest Update

6/recent/ticker-posts

Header Ads Widget

संविधान दिन - स्वरचित काव्यलेखन

संविधान दिनानिमित्त राज्यातील सर्व शाळांमध्ये  "माझे संविधान, माझा अभिमान" हा उपक्रम राबविला जात आहे. या उपक्रमांतर्गत स्वरचित काव्यलेखन याविषयीचे नमूना पहा. 


संविधान दिन - स्वरचित काव्यलेखन


भारतीय संविधान उद्देशिका / प्रस्तावना PDF डाउनलोड करा. 

संविधान यात्रा / संविधान निर्मितीचा प्रवास/ निबंध लेखन 

संविधान दिन - फलक लेखन नमूने

संविधान दिन - स्वरचित काव्यलेखन

संविधान दिन - पोस्टर निर्मिती / घोषणा


माझे संविधान माझा उपक्रमांतर्गत

काव्यलेखन

गट क्रमांक ४

प्राथमिक शिक्षक व माध्यमिक शिक्षकांसाठी

सौ.संगिता तुळशीराम पवार

सरस्वती विद्या निकेतन

पा.सा .विक्रोळी (प.) मुं -७९


विषय  :- संविधान दिन

भारतीय थोर विचारवंतांनी

केला अभ्यास राज्यघटनेचा

२६ नोव्हेंबर १९४९ दिवशी

स्वीकार केला संविधानाचा ||


२६ जानेवारी १९५० पासूनी

लोकशाहीचा केला विचार

अथक प्रयत्नातून आंबेडकर

बनले राज्यघटनेचे शिल्पकार ||


स्वातंत्र्य ,समता ,,बंधुता

करूया सर्व मूल्यांचे जतन

विश्वबंधुत्वाचा मिळे संदेश

संविधान भारताची शान ||


संविधानाचा करुनी अंमल

अर्थ आला राज्यव्यवस्थेला

शांतीची शिकवण  घेऊनी

सदा स्मरावे संविधानाला ||


दिशा मिळाली देशकारभाराला 

कायदा ,व्यवस्था संविधानात

आम्ही भारतीय नागरिक बोले

"सत्यमेव जयते"घोषवाक्यात ||


नांदोत सारे सर्वधर्म एकत्र 

करू संविधानाचा सन्मान

 लोकशाहीयुक्त देशातील

 संविधानाचा असे अभिमान ||

Post a Comment

0 Comments

close